पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-वसईत चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे. हि कोंबडी पाहून तिचा मालकही अवाक झाला आहे. अशाप्रकारच्याही कोंबड्या असतात का असा त्यांना प्रश्न पडलाय. दरम्यान या कोंबडीची चर्चा संपूर्ण वसईत रंगली आहे. त्यामुळे या कोंबडीला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमतेय.

गास गावात राहणाऱ्या कॉर्नेलियस पास्कोल अल्फान्सो यांच्या घरात 29 डिसेंबर 2019 रोजी एका कोंबडीने दिलेल्या अंड्यातून चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे. हि कोंबडी सर्वसामान्य कोंबडी पेक्षा अतिशय वेगळी आहे. सर्वसामान्य कोंबडीला दोन पाय, दोन पंख, दोन डोळे, तोंड,तुरा असतो. मात्र या कोंबडीला पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला दोन पाय आहेत. अशाप्रकारच्या क्वचितच घटना घडतात.

दरम्यान अल्फान्सो या कोंबडीची जास्त काळजी घेत आहेत, कारण या कोंबडीला इतर कोंबड्याप्रमाणे चालता येत नाही. तसेच विशेष काळजी ही घेतली जात आहे. दरम्यान या घटनेची चर्चा वसईत रंगली असून बघ्यांची गर्दी जमतेय. या कोंबडीला पाहुण स्थानिकांना अचंबित व्हायला होत.

अल्फान्सो यासंदर्भात सांगितले कि, त्या दिवशी मी दुपारी झोपलो होतो. त्यावेळी मला आमच्या कोंबडीने चार पायाचे पिल्लू दिल्याचे स्वप्नात आले. त्यांनतर मला जाग आल्यावर मी कोंबडीच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर तिने अंड्यातून १० पिल्ले काढली होती. त्यामध्ये तिने एका चार पायाच्या पिल्लाला जन्म दिला होता. हि घटना पाहूणच मी आच्छर्यचकीत झालो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here