डहाणू मतदार संघाचे आशास्थान दामोदर शिराड रांधे

पालघर-योगेश चांदेकर –

१२८ डहाणू (अ.ज.) विधानसभेचे अपक्ष उमेदवार दामोदर शिराड रांधे मु. सुत्रकार (ता. पो. तलासरी जि .पालघर ) चे रहिवासी आहेत .त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथे झाले आहे . सन १९७५ साली दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत . तर १९८० झाली ते बी.ए. झाले आहेत.
असे सुशिक्षित,सुसंस्कृत, मनमिळावू, मितभाषी व कर्तव्यदक्ष उमेदवार म्हणून तेे सर्वत्र परिचित व लोकप्रिय आहेत.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मध्ये त्यांनी लिपिक पदापासून नोकरी सुरुवात केली आहे . लिपिक पदावरून नोकरी सुरुवात करणाऱ्या दामोदर रांधे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हिशोबनीस व त्यानंतर शाखा व्यवस्थापक आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर यशस्वीरीत्या नोकरी करून एकूण पस्तीस वर्षे सेवा केली आहे. बँकेमध्ये अतिशय उत्तम सेेेवा बजावल्यानंतर ते ३१ मे २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

सेवानिवृत्तीनंतर सेंद्रिय शेती उत्तमरित्या करीत शेतीमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला असून उत्तम शेतकरी म्हणून ते ओळखले जातात. सेंद्रिय शेतीतील त्यांच्या नवनवीन उपक्रमांचा परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन होत असून मागील वर्षीच पालघर जिल्ह्यातील विरार येथे भरविण्यात आलेल्या शेती महोत्सवात यशस्वीरित्या भाग घेऊन सुरण, चिक्कू ,लाल तांदूळ या सेंद्रिय शेतीतून उत्पादन केलेल्या व वस्तूंची विक्री केली असता जिल्हाधिकारी व खासदार यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. शेेती महोत्सवामध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली उत्पादने मोठी आकर्षण ठरलेली होती.
बँकेत नोकरी करीत असताना बँकेच्या केंद्र कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत असताना पालघर जिल्ह्यातील जनतेची कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करून दिल्यामुळे जनमाणसात ते खूपच लोकप्रिय आहेत. अनेक जण त्यांनी बँकेच्या माध्यमातून केलेल्या मदती विषयी आजही कृतज्ञतेच्या भावनेतून बोलत असतात हीच त्यांच्या कार्याची एक मोठी ओळख ठरलेली आहे अशा उमेदवारास निवडून दिल्यास भविष्यात निश्चितच आपल्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशीही चर्चा त्यांच्यामधून सातत्याने होत असते.

समाजाच्या समस्यांची जाणीव त्यांना असून त्या समस्या सोडवण्याची कळकळ त्यांच्या मनात नेहमीच असते .सामाजिक समस्यांची जाण व तळमळ , शुद्ध चारित्र्य यांची कसोशीने जपणूक त्यांच्याकडून केली जात असल्यामुळे लोकांना ते नेहमीच आपलेसे वाटत असतात. बँकेशी संबंधित कोणतीही काम असल्यास लोक आजही त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात आणि तेही त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जातात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे .अनेक पतसंस्था व सहकारी संस्थांच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग आहे .
समाजातील घटकांच्या साठी तळमळीने काम करत असतानाच त्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी ही अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे .त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले असून एक मुलगा बी.टेक होऊन केनिया येथे प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर नोकरी करीत असून दुसरा मुलगा आयटी इंजिनीअर असून तो मुंबई येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत आहे.
अशा या सर्वगुणसंपन्न असणाऱ्या उमेदवारास निवडून देण्याविषयी जनमानसात मोठा उत्साह दिसून येत आहे आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा या सुसंस्कृत आणि लोकहितदक्ष असणाऱ्या उमेदवारास निवडून दिल्यास ते मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत अशी रास्त अपेक्षा जनसामान्यांच्या मधून उमटत आहे.

त्यांनी निवडून आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी खालीलप्रमाणे कामे करण्याचा संकल्प केला आहे

१) शिक्षण :- विद्यार्थी केंद्र बिंदू मानून पालक, बालक व शिक्षक यांचे संबंध विश्वासाचे व सलोख्याचे
ठेवून त्यांच्या प्रतिष्ठेची जपणूक करून सन्मानपूर्वक त्यांचे प्रश्न सोडवू व शिक्षणाचा दर्जा वाढवून आणि उच्च
शिक्षण व वस्तीगृह याविषयी उपाययोजना करणार.
२.) आरोग्य :- बालवाडी, अंगणवाडी, आरोग्यसेवक/सेविका व महिला बचत गट यांचे कार्य
वाखाण्यासारखे आहे तरी त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडवणी सोडविण्यास उपाय योजना आखणार.

३) रोजगार:- शासकिय व निमशासकिय सेवेत स्थानिकांना प्राधान्य देवून बंद पडलेले कारखान्यांचे प्रश्न
सोडवणार, रोजगार मिळवून देण्यास प्रयत्न करणार.

४) व्यापारी, दुकानदार व कारखानार यांचे प्रश्न समजून घेवून ते सोडविण्यास कटीबध्द.

५) अल्पसंख्याक समाजाला विश्वास देउन त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार.

६) शेतीची सुलभतेनी खातेफोड व नावावर कारणे. कसेल त्याची जमिन या तत्वावर नावावर न झालेल्या
जमिन नावावर करून देण्यास प्राधान्य देणार.

७) पर्यावरणला हानिकारक व स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्पाविषयांचे भेडसावणारे प्रश्न शासनापुढे
मांडून जनतेला न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार.

८) शासकिय योजनांचा पूर्ण १०० टक्के निधी याच मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी देणार.

९) बाहेरगावी कामासाठी जाणारा मजूर वर्ग, रेती, मिठागर, मच्छीमारी व वाडी यांच्या सुरक्षितेसाठी उपाय योजनांची आखणी करणार. कारखान्यात व रोकडयावर जाणाऱ्या स्त्रियांच्या व पुरुषांच्या समस्या
सोडवणार.

९) शेती व शेतीपूरक रोजगाराची निर्मिती करून व प्रोत्साहन देणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here