श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

200 खाटांच्या रुग्णालयाच्या निर्माणाचा मार्ग मोकळा

नव्वद कोटी बासष्ट लाख रुपयांची प्रशासकी मान्यता

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-गेली काही वर्षे ज्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा केला ती जव्हार कुटीर रुग्णालय श्रेणीवर्धनाची मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. कुटीर रुग्णालयाला 200 खाटांचे हॉस्पिटल बनविण्यासाठी अखेर निधी मिळाला आहे, उच्चाधिकार समितीने तब्बल 90 कोटी 62 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. याबाबत नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय पारित केला आहे.

जव्हार येथे असलेला पतंगशाह कुटीर रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयाचे वाढलेल्या लोकसंख्येच्या आणि आदिवासी रुग्णांना आवश्यक सेवेचा विचार करता श्रेणीवर्धन क्रमप्राप्त होते. याबाबत श्रमजीवी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. ठाणे येथे निघालेल्या विराट मोर्चा मध्ये, शिमगा मोर्चा मध्ये, भिवंडी ते विधानभवन पायी मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत असे अनेकदा या मागणी बाबत आग्रह धरला होता. स्वतः विवेक पंडित यांनी यासाठी अनेकदा मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री यांच्याशी स्वतः चर्चा केली होती.
मंत्री गिरीश महाजन यांच्या जव्हार भेटीच्यावेळी श्रमजीवी संघटनेने त्यांना फराळ देत आपल्या मागण्या मांडल्या होत्या, त्यावेळीही ही प्रमुख मागणी केली होतो , गिरीश महाजन यांच्यासोबत त्यावेळी डॉ.तात्याराव लहाने हेही होते.

यानंतर विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विनीत मुकणे यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता.

अखेर राज्य शासनाकडून उच्चधिकार समितीच्या मान्यतेने 90 कोतो 62 लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कुटीर रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आमची एक मागणी सरकारने  मान्य केली त्याबद्दल आम्ही सरकारचे विशेषतः मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो, मात्र हे रुग्णालय 300 खाटांचे करून त्याठिकाणी मिलिटरी मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर मेडिकल कॉलेज निर्माण करून याभागात काम सेवाभावी वृत्तीने करणारे एमबीबीएस डॉक्टर घडविण्यासाठी पुढे पाठपुरावा सूरु राहील असे यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here