जिल्हा परिषद पालघर कार्यालयात भारताचे संविधान उद्देशिका वाचन संपन्न

0
1176

MumbaieNews:[पालघर-योगेश चांदेकर]

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ या दिवशी भारताचे संविधान अंगिकृत आणि अधिनियमीत करुन स्वत: प्रत अर्पण करण्यात आले. भारतीय संविधान निर्मितीमधील संस्थापकांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणुन २६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी या करीता शासकीय, निमशासकीय, कार्यालयात संविधनाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साप्रवि., जि.प.पालघर, संघरत्ना खिल्लारे, यांच्या दालनात तसेच अध्यक्षतेखाली संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, वाचन भूषण तरे, क.प्र.अ., पाणि पुरवठा विभाग यांनी केले , प्रसंगी सहा. गट विकास अधिकारी, ग्रापं. बाबुलाल केाळी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here