त्या आंदोलन प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

0
1264

पालघर-योगेश चांदेकर

पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाल्या नंतर नव्याने झालेल्या जिल्हा भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलले गेले होते, त्या मुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, ह्या असंतोषाला वाट मोकळी करून देत मनसे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे ह्यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते .
खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन झाल्यामुळे शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती व सदर आंदोलन जिल्ह्यात गाजले होते त्या वेळेस पालघर पोलीस स्टेशन चे तात्कालीन पोलीस निरीक्षक निलेश माईंकर ह्यांनी आंदोलन प्रकरणी मनसे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, पालघर लोकसभा अध्यक्ष मनवीसे धीरज गावड, उपतालुका अध्यक्ष सुनील पाटील, विभाग संघटक मनीष पाटील, भुपेंद्र वैद्य, माधुरी संखे, कामिनी पाटील, नीता राऊत ह्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता .

सदर प्रकरणी ४ वर्ष झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी वेगवेगळे पुरावे सादर केले होते सदर प्रकरणात आरोपींन कडून ऍड. विजय संखे तर सरकारी पक्षा कडून ऍड.दातरंगे ह्यांनी बाजू मांडली होती सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्या नंतर अंतिम निकाल देत असताना प्रथम वर्ग सह दिवाणी न्यायाधीश श्री.तेलंगावकर ह्यांनी सरकारी पक्ष सबळ पुरावा न देऊ शकल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here