पंढरपुरात मंदिर समिती तर्फे ताक, खिचडी मिळणार

0
1135

सर्व त्या आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी मंदिर समितीची जय्यत तयारी सुरू असून, यंदा उन्हाचा कडाका लक्षात घेता चैत्री एकादशी निमित्त येणाऱ्या दर्शन रांगेतील भाविकांना विट्ठल रुक्मिणी मंदिर समितीने  दशमी, एकदशीच्या दिवशी थंडगार ताक आणि मठ्ठा शाबूदाणा खिचडी देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे सुमारे 950 तर मंदिर समितीचे 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचेही ढोले यांनी सांगितले. येत्या 15 आणि 16 एप्रिलच्या दरम्यान चैत्री यात्रेचा सोहळा संपन्न होत असून, पंढरपूर नगरपालिकेच्या बरोबरीने मंदिर समितीनेही यात्रेची जय्यत तयारी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीने यापूर्वीच शेडनेट उभी केली आहे. यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीने दर्शन रांगेसह मंदिर परिसरात पिण्याच्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याची सोय केली आहे. मंदिर परिसरात नगरपालिकेने पुरेशा स्वच्छता गृहाची सोय केली आहे. भाविकांना चंद्रभागेत स्नानासाठी पूरेसे पाणी रहावे म्हणून मंदिर समितीने स्वतःचे सुरक्षा कर्मचारी गोपाळपूर बंधाऱ्यावर नेमले आहेत. त्यामुळे येथील चंद्रभागा पात्रातील पाण्याची पातळी समाधानकारक आहे. तसेच

यापूर्वी फक्त एकादशी दिवशी भाविकांना खिचडी दिली जायची मात्र गेल्यावर्षी मंदिर समितीने आषाढी यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा वाढवल्या आहेत.  समितीच्या निर्णयाचे भविकातूनही स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here