पालघर-योगेश चांदेकर

पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुण केतन जाधव या मुलाने एव्हरेस्ट सर केलाय. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मिशन शौर्य-२ या शिखर मोहीमेअतर्गत त्याने ही धाडसी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीने पालघर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव मोठे झालेय. सध्या त्याचा या कामगिरीवरून संपूर्ण महाराष्ट्र भरातून त्याचे कौतुक होतेय.

महाराष्ट्र शासनातर्फे मिशन शौर्य-२ या शिखर मोहीमेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प विभागामार्फत एकूण २००  विद्यार्थ्यापैकी ११ विद्यार्थांना निवडण्यात आले होते. या ११ विद्यार्थ्यामध्ये मध्ये केतन जाधवचीही निवड झाली होती.

२३  मे रोजी सकाळी पाच वाजून दहा मिनटांनी त्याने एव्हरेस्ट शिखर सर करत ही मोहीम पूर्ण केली.त्यांनतर आता तो आपल्या गावी परतलाय. आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुलाने केलेल्या कामगिरीवरून त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, गावात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील सांबरपाडा या गावातील केतन जाधव राहतो. देवगाव येथील माधवराव काणे आश्रमशाळेत तो सध्या ११ वीत शिकत असुन त्याला भावी आयुष्यात भारतीय लष्करात भरती व्हायचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here