पालघर-योगेश चांदेकर :

पालघर – पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेच वर्चस्व पाहायला मिळालं .  ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती .  मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलंय  . जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18  , राष्ट्रवादी काँग्रेस 15,  भाजप 10,  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 , बहुजन विकास आघाडी 4 , अपक्ष 3,  तर काँग्रेस ला अवघ्या एका जागेवर समाधान माणाव लागलं आहे . 57 जागांपैकी बहुमतासाठी 29 जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता असली तरी यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे  पालघर जिल्हा परिषदेत ही महा विकास आघाडी होण्याची शक्यता आहे .

जिल्हा परिषदेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात सेना राष्ट्रवादीला यश आल्याचं पहायला मिळतय . जिल्हा परिषद सह झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे , तालासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे , जव्हार पंचायत समिती भाजपाकडे , विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू , वाडा आणि वसई यातीन पंचायत समित्यांवर महा विकास आघाडीला संमिश्र यश आल आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here