पालघर-योगेश चांदेकर

पालघर-पालघर जिल्हा कॉग्रेस कमिटी ची बैठक जिल्हा अध्यक्ष केदार काळे ह्याच्या अध्यक्षते खाली आयोजीत करण्यात आली होती तेव्हा त्यानी मतभेद बाजूला ठेवुन विधानसभा निवडणूक जिकण्या साठीच तयारीला लागा असे अहवान केले .
जिल्हा अध्यक्ष काळे पुढे म्हणाले लोकसभा व विधानसभा ह्या वेगवेगळ्या मुद्यावर लढविली जाते . लोकसभा निवडणूकीचा निकाला पेक्षा चांगला व कॉग्रेस ला अनकुल निकाल विधानसभा निवडणूकीत पहायला मिळतील .
कॉग्रेस, राष्ट्रवादि कॉग्रेस ,बहुजन विकास आघाडी , व इत्तर समविचारी पक्षांची आघाडी होणारच आहे पण काही कारणाने झाली नाही तरी कॉग्रेस पक्षाकडे जिल्ह्यात प्रत्येक विधानसभे मध्ये एका पेक्षा जास्त उमेदवार तयार आहेत .
काही पदाधिकारी विरोधी पक्षांची सुपाती घेउनच कॉग्रेस पक्ष संपव्ण्याचा घाट घालत आहे पण जो पर्यंत सामान्य कॉग्रेस जन जिवंत आहे तो पर्यंत ह्या प्रयत्नात यश येणार नाही अनेक वर्षे सत्ता पदे उपभोजुन परत परत त्यानाच पदे पाहीजे असल्यास ह्या पुढे चालणार नाही .
अनेक चांगले कार्यकर्ते अशा पदाधिकाऱ्यांना कंटाळुन पक्ष सोडुन गेले .
पण आपण सर्व मिळून कॉग्रेसचा झेंडा फडकवित ठेउ .
प्रदेश चिटणीस विजय पाटील ह्यानी बहुजुन विकास आघाडी सोबत आघाडी करताना सन्मान जनक आघाडी करावी असे आपल्या भाषणात सांगितले व वसई विधानसभा आग्रहाने मागावी असे प्रतीपादन केले .


डहाणु तालुका अध्यक्ष ह्यानी डहाणु शहरातील एक कार्यकर्ता सतत सोशल मिडीयावर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांन बाबत टिका करीत असतो अशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली .
पालघर तालुका अध्यक्ष राजेश आधिकारी ह्यानी पदाधिकारी वेळ देत नाहीत अशी खंत व्यक्त केली व जिल्हा परीषद नुसार बैठका चालु केल्याचे सांगीतले विधानसभा निवडणूकीत त्याचा उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली जव्हार अध्यक्ष केशव गावंडा ,मोखाडा अध्यक्ष जमशेद लारा आदिवासी सेल अध्यक्ष बळवंत गावित जिल्हा सेक्रेटरी अदमान धांगे ह्यानी आपले विचार मांडले जिल्हा सरचिटणीस सुरेन शेट्टी ह्यानी सूत्रसंचालन केले शहर अध्यक्ष शैलेश ठाकूर ह्यानी स्वागत केले . बैठकीला डॉ अनिरुद्ध बिरवडकर ,हफिजु खान अमरसिंग ठाकुर वनिता पाटील सोमनाथ किरकिरा अशोक पाटील राम प्रकश निराला चंद्रकांत जाधव कर्णा त्रिवेदी मिनाराई पाटील प्रकाश पटनाईक योगेश नम विशांत पागधरे चिराग देसाई उमेश वर्मा महेश देसाई प्रेम सिंग बोजानी हैदर सय्यद विशांत पागधरे संदिप मेणे असीफ मेमन संतोश रसाळकर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here