केवळ आंदोलनापर्यंत मर्यादित न राहता शाश्‍वत स्वरूपाचे काम करणार – कुंदन संखे

प्रभावी अंमलबजावणीचा अभाव तसेच सेवेची दृष्टी हरवून बसलेले शासन – कुंदन संखे

पालघर-योगेश चांदेकर

पालघर जिल्ह्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरु असून, पिण्यासाठी पाणी मि‌ळणे देखील दुरापास्त झाले आहे. त्यामुळेच  पालघरचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जव्हार मधील मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेलेल्या पाथर्डी गावांत चार पाण्याच्या टाक्या बसवून सर्वसामान्य जनतेला एक दिलासा देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

आज पालघर जिल्हा संपूर्ण दुष्काळाच्या सावटा खाली असून,शेकडो गावे ओसाड पडली आहेत. पाण्यात अभावी लाखो लोकांनी स्थलांतर केलेले आहे. जनतेचे जीवनच उद्ध्वस्त करणारी भयान परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन नावाच्या विक्राळ व्यवस्थेने झोपेचे सोंग घेतले आहे असा आरोप कुंदन संखे यांनी करून, दुष्काळ निवारण करणे सरकारची जबाबदारी आहे. परंतु प्रभावी अंमलबजावणी बरोबरच सेवेची दृष्टी हे सरकार हरवून बसले असल्यामुळे संखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे ढिम्म शासनच्या विरोधात केवळ आंदोलनाची भूमिका न घेता, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कुंदन संखे यांनी आज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जव्हार मधील दुर्गम भागातील आणि मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेलेल्या पाथर्डी गावात चार पाण्याच्या टाक्या बसवून दिल्या. जेणेकरून सर्व सामान्य जनतेची पाण्यासाठी होणारी पायपीट आणि जीवघेणी धडपड कमी होईल. तसेच पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी भगिनींच्या चेहऱ्यावर आज स्मित हास्य उमटले आहे.
त्याचप्रमाणे चार ते पाच गांवात असाच उपक्रम राबविण्यात येईल असे संखे यांनी जाहीर केले.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, जव्हार तालुका अध्यक्ष गोपाळ वझरे, उपतालुका अध्यक्ष सोमनाथ पिठोले, पालघर तालुका सचिव दिनेश गवई, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, निलेश घोलप, मनविसेचे पालघर विधानसभा सचिव जालीम तडवी, शिवा यादव, बाळू दापट, विलास सापटे, अतुल खरपडे, संदीप जाधव, देवा टोकरे, परशुराम वझरे, कैलास नवले, संतोष वझरे, किसन भोये, प्रमिला वझरे, शबी वझरे, जाई खरपडे, सुनीता पिठोले, सपना भुजड, तसेच मनसे सैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here