लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात २४ एप्रिल २०१९ अखेर प्रतिबंधात्मक आदेश जारी

0
1109

कोल्हापूर दि. ११ – लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात २४ एप्रिल २०१९ अखेर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत.

याआदेशानुसारकोल्हापूरजिल्हाकार्यक्षेत्रातक्रिमिनलप्रोसिजरकोड१९७३चेकलम१४३नुसारलोकसभा निवडणूक२०१९च्याकालावधीतपुढीलप्रमाणेआदेशजारीकरण्यात आले आहेत.

) निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही.

) निवडणूक कालवधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी ६ वाजल्यापूर्वी व रात्री १० वाजलेनंतर करता येणार नाही.

) कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही.

) मतदान प्रक्रीया पुर्ण होण्याच्या वेळेपासून ४८ तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर

करता येणार नाही.

) कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करणेत आलेल्या ठिकाणाचे जवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था इ. सारख्या सार्वजनिक ठिकाणांजवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही.

) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मतदानादिवशी मतदान केंद्र विनिर्दिष्ट करणेत आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासून १०० मीटरचे परिसरात कोणाही व्यक्तीला खालील कृत्य करता येणार नाही.

.) कोणत्याही स्परूपात निवडणूक विषयक प्रचार करणे.

.) मतदारांना धमकविणे.

.) मतदारांवर ठराविक मतदारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे.

.) मतदारांचा मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे.

.) उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे.

.) मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करणे इ.

) राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अगर आदर्श आचारसंहिता भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्क्ल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्याचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही.

) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चे अनुषंगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ () मधील तरतुदींचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही.

) शस्त्र अधिनियम १९५९ व शस्त्र नियम १९६२ चे तरतुदीखाली विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षक यांचे पुर्वपरवानगीने (खाजगी सुरक्षा वगळून) नॅशनलाईज्ड बँका, सहकारी तत्वावरील बँका, महत्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लीक, एंटरप्राइजेस यांना अशी हत्यारे (व दारुगोळा) वाहतुक करता येईल, तथापी सदरचा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (पोलीस अधिकारी व कर्मचारी) यांना लागू राहणार नाही.

१०) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या कालावधीत मोटारगाड्या, वाहने कोणत्याही परिस्थीत ०३ (तीन) पेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सदर आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्यांच्या ताफ्यात तो केंद्र किंवा राज्य शासनाने किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तिस घेऊन जात असेल आणि सुरक्षेच्या दृष्टिने त्यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

११) निवडणूक विषयक प्रचाराच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५ मधील तरतुदींचा भंग होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करता येणार नाही.

१२) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ४७कोल्हापूर व ४८हातकणंगले या लोकसभा मतदार संघात मतदार म्हणून नोंद नसलेल्या / मतदानाचा हक्क बजावणेस पात्र नसलेल्या राजकीय पक्ष प्रमुख व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून ४८ तासाच्या कालावधीत सदर मतदार संघात वास्तव्य करता येणार नाही.

By mumbaienews.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here