विवेक पंडितांच्या योगदानाने ७१८ अस्थायी बीएएमएस डॉक्टर्सच्या लढ्याला यश

0
1425

पालघर-योगेश चांदेकर

राज्यात शासकीय वैद्यकीय आस्थापनेत इमाने इतबारे सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या लढ्याला राज्यशासनाने अखेर स्थायी सेवेत समाविष्ट केले. गेली अनेक वर्षे या डॉक्टर्सनी यासाठी लढा दिला. 2015 पासून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि आताचे राज्याचे आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी या डॉक्टरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्न केले होते. श्रमजीवीच्या अनेक विराट आंदोलनांमध्ये या प्रश्नावर शासनाकडे न्यायाची  मागणी केली होती. अखेर या लढ्यात यश आले, विवेक पंडित यांच्या बळामुळे हा लढा यशस्वी झाल्याचे सांगत या ७१८ बीएएमएस डॉक्टर्स प्रतिनिधींनी पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेत आभार मानले.

राज्यात सर्वत्र विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये काम करणारे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात सन २०१५ पासून सेवेत घेतलेले ७१८ बी. ए.एम. एस. अर्हता धारक वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात कार्यरत होते.त्यांना नियमित स्वरूपाच्या सेवेचा कोणताही लाभ मिळत नसताना देखील अतिदुर्गम आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरवित होते.
बीएएमएस वैद्यकीय अधिकारी हे अस्थायी स्वरूपात काम करत होते. इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांना स्थायी सेवेत समाविष्ट केले गेले नव्हते. श्रमजीवी संघटनेच्या कुपोषण मुक्तीच्या लढ्या दरम्यान या डॉक्टरांनी आपल्या व्यथा विवेक पंडित यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर अनेकदा पंडित यांनी डॉक्टरांना यासाठी लढायला प्रेरित केले, राज्यभर एकाच वेळी काम करून आपल्या मागणीसाठी उपाशीपोटी आंदोलन करण्याची अभिनव कल्पना त्यांनी आखली, या लढ्यात श्रमजीवी देखील उतरली. लढ्याला य विविध मार्गाने बळ देण्याचे काम पंडित यांनी केले. संघटनेच्या अनेकदा निघालेल्या भव्य मोर्चामध्ये या डॉक्टरांना कायम करावे ही मागणी लावून धरली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या अनेक बैठकांमध्ये पंडित यांनी याबाबत चर्चा केली. या डॉक्टरांच्या व्यथा त्यांनी महामहिम राज्यपाल यांच्याकडेही मांडल्या.

एवढेच नव्हे तर काही दुर्धर आजारी अधिकाऱ्यांच्या उपचाराकरिता देखील विविध पातळीवर पंडित यांनी मदत केली.आज त्यांनी केलेल्या मदतीमुळे ८१८ अस्थायी वैद्यकीय न्याय मिळाला व त्यांच्या  सेवा स्थायी करण्यात आल्यात त्याबद्दल विवेक पंडित यांच्या उसगाव येथील कार्यालयात या डॉक्टरांच्या वतीने डॉ. अरुण कोळी, डॉ.किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेत आभार व्यक्त केले.
या आभाराचा मानकरी मी नाही, मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले असे सांगत, तुम्हा सर्वांकडून गरीब आदिवासी दुर्बल रुग्णांची सेवा घडावी आणि ती सेवा देण्यासाठी तुम्हाला बळ मिळावे या सदिच्छेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असे उद्गार यावेळी पंडित यांनी काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here