सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

0
1151

MumbaieNews:[पालघर-योगेश चांदेकर]

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वंतत्र भारताचे संविधान देशाला अर्पण करण्यात आले. आज या ऐतिहासिक घटनेला ७० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. झेंडावंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तदनंतर लाॅ काॅलेज प्रोफेसर व विद्यार्थ्यांमार्फत संविधानाला मानवंदना अर्पण करण्यात आली. गेल्या सत्तर वर्षांतील आपल्या संविधानाची वाटचाल व आत्ताची राजकीय परिस्थिती बाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. अनुच्छेद ३५६ (राज्यातील राष्ट्रपती राजवट) या विषयावर वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अगदी घटना निर्मिती पासून, सद्यस्थिती पर्यत अनुच्छेद ३५६ व त्याच्या वापराबाबत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पायल चोलेरा यांनी केले. तदनंतर प्रोफेसर राधा मित्रा‌ यांनी अधिक तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजनासाठी प्रो. दिशा तिवारी, प्रो. उत्कर्षा, प्रो. विनोद गुप्ता, प्रो. प्रिया तांडेल यांचे सहकार्य लाभले.

संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचा आत्मा:
आणि आजच्या ऐतिहासिक दिनविशेषाचे औचित्य साधून विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “राज्यघटनेची प्रास्ताविका” महाविद्यालयास भेट दिली. आजच्या दिवशी “संविधानाची प्रास्ताविका” महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत मिळणे यापेक्षा दुसरा आनंद तो काय! या शब्दसुमनांनी प्राचार्य डॉ.पायल चोलेरा यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here