स्कॉलरशिप परीक्षेत पालघरचा अवधूत गोलेकर राज्यात दुसरा

0
1452

पालघर-योगेश चांदेकर

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत पालघर मधील अवधूत गोळेकर हा विद्यार्थी ९५ . १० टक्के गुण मिळवत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. अवधूतच्या या यशाने पालघर जिल्ह्याचा लौकिक वाढला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवधूत हा बालपणापासून अभ्यासू व कुशाग्र बुद्धीचा असल्याने आजवर त्याने अनेक राज्यस्तरीय परिक्षांमध्ये चांगले यश मिळविले आहे.यापूर्वी ४ थीच्या स्कॉलरशिप परीक्षेतही त्याने राज्यातून ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. तर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परिक्षेतही त्याने ३ ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश मिळविले आहे. त्यामुळे अवधूत सातत्याने मिळवत असलेल्या यशाने त्याच्यातील गुणवत्ताच सिध्द होत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आय पी एम स्पर्धेतही त्याने प्रथम क्रमांक मिळविला असून आय एम ओ स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. एन एस टी एस ई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने आपल्या यशात सातत्य राखल्याने विद्यार्थी वर्गात व परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. मात्र या यशाने अजिबात हुरळून न जाता अवधूत या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांसह गुरुजनांना देताना दिसतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here