हरियाणवी शेतकऱ्याची किमया भारी ; डहाणूत पिकवली स्ट्रॉबेरी

0
2091

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- डहाणू तालुक्यातील ब्राम्हणवाड़ी येथे हरियाणा येथील शेतकरी याने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड करुन अनोखा प्रयोग केला असून रणवीर सिंग वय ४३ असे या शेतकर्याचे नाव आहे सदर लागवड ही यानी आपल्या मित्रा सोबत भागीदारीत केली असून याकरिता त्यांनी डहाणू तालुक्यातील ब्राम्हणवाड़ी येथे ७ एकर शेती वर्षाला २ लाख रुपये भाड़ेतत्वावर घेऊन हा अनोखा प्रयोग केला आहे.

दरम्यान रणबीर याना ब्राम्हणवाड़ी या गावात येऊन ८ महीने झाले असून या काळात त्याने ८००० स्ट्रॉबेरी रोपे ही महाबलेश्वर येथील वाई येथून रोप आणली व अर्धा एकर पेक्षा कमी जागेत याची लागवड केली आहे यामधे त्याना एकूण खर्च हा वर्षाला दीड लाख रुपये होणार असून यातून त्याना जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ५ लाख इतके उतपन्न भेटू शकते याकरिता त्याना या घडिला जे टेंप्रेचर हवे आहे ते मिळत नसल्याने समस्या होत आहे सध्या तिथे २९% टेम्प्रेचर असून या उतपनाला २५% ते २८% टेम्प्रेचर लागते

कमी जागेत जास्त उतपन्न देणारे स्ट्रॉबेरी हे फळ असून याकरिता ही शेती सर्वाना फ़ायदेशीर ठरू शकते अस रणबीर यांनी सांगितले यापूर्वी त्यानी १२ वर्ष हरीयाणा येथे १० एकर मधे स्ट्रॉबेरी लागवड केली होति पण त्याना तेथे योग्य ते मार्केट न मिळाल्याने यात ते हताश न होता त्यानी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील ब्राम्हणवाड़ी येथे जागा भाड़ेतत्वावर घेतली सध्या या फ़ळाची सुरवात असून २० ते २५ mm इतकी साइज स्ट्रॉबेरीची झाली आहे

स्ट्रॉबेरी हे उतपन्न महाराष्ट्रामधील महाबलेश्वर येथे व हरियाणामधील ईसार येथे मोठ्याप्रमाणात घेतले जाते या फ़ळाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत जास्ती उतपन्न देते एक एकर मधे ३० हजार रोप लागवड करु शकतो याकरिता ५ लाख रुपये वर्षाला खर्च होतो व यातून जवळपास यावर खर्च काढून ५ ते ६ लाख इतका नफा मिळतो

तसेच लागवड झाल्याच्या २ महीन्यानंतर हे फळ उतपन्न द्यायला सुरु करते याचे उतपन्न पाहिले तर ते वर्षातुन ४ महीने ते ८ महीने उतपन्न देते
होलसेल मार्केटमधे या फ़ळाला दोन किलो कॅरेटला ४०० ते ५०० रुपये इतका भाव आहे. या फ़ळाचे वैशिष्ट म्हणजे यात विटामिन (सी) आणि ओमेगा ३ व शुगरफ्री फळ असल्याने याला मागणी जास्त आहे. याचे भारतात मुंबई व दिल्ली येथे सर्वात मोठे मार्केट आहे तसेच हे फळ भारतातून एक्सपोर्ट सुधा केले जाते त्यामुळे कमी खर्चात कमी जागेत जास्त उतपन्न देणारे फ़ळ असल्याने याची लागवड सर्व शेतकरी यांनी करावी अस रणबीर यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here