पालघर ब्रेकिंग: सफाळे भागातील ५२ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह..!

0
432
डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी पालघर व टीम

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील सफाळे भागात ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वेक्षणात SARI/ILI ची लक्षणे आढळल्याने सदर रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा कोरोना रिपोर्ट प्राप्त झाला असल्याचे समजते.

सफाळे भागात नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला इसम हा बेस्ट मध्ये ड्रायव्हर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्या कुटुंबातीलच ४ अतिजोखमीच्या सहवासितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या टीमने रात्रीच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४ जणांना क्वारंटाईन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here