पालघर: बोईसरमध्ये १ जण कोरोना पॉझिटिव्ह; १० जण अति जोखमीच्या सहवासात!

0
443

पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील एका इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा इसम काही दिवसांपूर्वीच मुंबईवरून आला होता. कुटुंबातील एक व्यक्ती उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल असल्याने हा इसम मुंबईत गेला होता तसेच बोईसरमधील १० जण या रुग्णाच्या अति जोखमीच्या सहवासात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील ३ वर्षीय कोरोनाबाधित मुलीला आजच कोरोनातुन मुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकणारे प्रशासन बोईसरमध्ये या नव्याने सापडलेल्या रुग्णामुळे हडबडले आहे. बोईसरमध्ये सापडलेल्या या रुग्णाला मुंबईतच कोरोना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here