पालघर: शहरात १ कोरोना पॉझिटिव्ह; ११ जणांना केल क्वारंटाईन!

0
436

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासन हडबडून गेले आहे. सदर कोरोनाबाधित महिला ही सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे तिच्यासोबत बसने ये-जा करणाऱ्या इतर ११ लोकांना साईबाबा नगर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर नर्स राहत असलेल्या परिसरासह आजूबाजूचा भाग सील करण्यात आला आहे.

दरम्यान क्वारंटाईन करण्यात आलेल्या इतर ११ लोकांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा तसेच बस चालक व वाहकाचा समावेश आहे. या सर्वांना साईबाबा नगर येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. या कोरोनाबाधित नर्सच्या अति जोखमीच्या सहवासात आलेल्या इतर लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु असून त्यांचे देखील विलगीकरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here