पार्किन्सन्स आजाराच्या लोकांना ‘कोरोना’ चा धोका आहे का?

0
318

पार्किन्सन्स आजाराच्या लोकांना ‘कोरोना’ चा धोका आहे का?

डॉ. पंकज अग्रवाल, वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजी आणि मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकचे प्रमुख, प्रभारी डीबीएस प्रोग्राम, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई

‘कोविड-19’ या आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ होत असताना या विषाणूचा सर्वांधिक संसर्ग होण्याचा धोका हा वयोवृद्धा असतो. त्यामुळे मज्जासंस्थेशी संबंधित असणारा पार्किन्सन्स या आजाराच्या रूग्णांना जरी कोरोनाचा धोका नसला तरी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळून येतो. त्यामुळे या वयोवृद्धांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून या लोकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

पार्किन्सन्स आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावीः-

· आठवडाभर पुरेस इतका आवश्यक औषधांचा साठा करा

· सार्वजनिक ठिकाणी प्रवास करणे टाळा

· घरातून बाहेर पडू नका

· या आजाराच्या वृद्ध रूग्णांनी स्वतःचे लसीकरण करून घेतले पाहिजे. जेणेकरून कोविड-19 विषाणूची लागण होणार नाही. कारण, या विषाणूच्या संसर्गामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. विशेषतः कुठल्याही वृद्ध व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यास तातडीने स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी संपर्क साधावा.

कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन सूचना:

कुटुंबात एखाद्या व्यक्तीला पार्किन्सन्स हा आजार असल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून या रूग्णाला कोविड-१९ या विकाराची लागण होणार नाही. त्यांनी सतत रूग्णांवर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच व्हायरसच्या संपर्कात येण्याचा धोका टाळण्यासाठी बाहेरील सहल कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असल्यास त्यांनी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवणे गरजेचं आहे. जेणेकरून अन्य निरोगी व्यक्तींना याची लागण होणार नाही.

कोरोनाबाधित आणि पार्किसन रूग्णांना काय करावेत?

· एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्याचे निदान केल्यास या विषाणूची बाधा अन्य व्यक्तींना होऊ नये, म्हणून काय काळजी घेतली पाहिजे.

· घरीच रहा, स्वतःला वेगळ्या खोलीत बंद करून घ्या, कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संपर्कात येऊ नका

· सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्यतो टाळा

· पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका

· वैयक्तिक गोष्टी इतरांना शेअर करणे टाळा

· कफ पडत असल्यास त्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावा

· नियमितपणे हात स्वच्छ धुवा

· फोन, किबोर्ड, शौचालयांचा परिसरात निर्जंतुकीकरण करून घ्या

· विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांच्या तारखेलाच रूग्णांनी रूग्णालयात उपचारासाठी यावेत. यासाठी रूग्णालयाने विशेष पावले उचलली पाहिजेत.

· घराबाहेर जाताना चेहऱ्यावर फेस मास्क लावणे गरजेचं आहे.

कोणत्या चाचण्या उपलब्ध आहेत?

कोविड-19 आजाराची तपासणी करण्यासाठी अनेक चाचण्या एफडीएच्या आपत्कालीन विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या चाचणीद्वारे कोरोनाची लागण व्यक्तीला झाली आहे किंवा नाही, हे अवघ्या काही मिनिटांतच कळते.

या आजारावर नेमका उपचार काय आहे?

कोरोनो व्हायरस या विषाणूची लागण झालेल्या रूग्णावर उपचारासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. अतिदक्षता विभागात रूग्णाची योग्य पद्धतीने काळजी घेऊन या आजाराचा प्रसार होणार नाही, याकडेच लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय अतिगंभीर रूग्णाला श्वास घेण्यास अडचणी येत असल्यास व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय आहे.

नवीन उपचारपद्धती विकसित होत आहे का?

या आजाराच्या रूग्णांवर उपचारासाठी लस तयार करण्यासाठी सध्या अनेक कंपन्या प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप अशी लस उपलब्ध झालेली नाही. पार्किन्सन्स हा मेंदूच्या पेशींचा आजार आहे. त्यातच आता कोरोना व्हायरस हा आजार नव्याने आल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुळात, कोविड-१९ हा आजार होऊ नयेत, म्हणून वारंवार हात धुण्याची गरज आहे. गर्दी टाळणे आवश्यक आहे आणि घराबाहेर प्रवास करणे शक्यतो टाळणे गरजेचं आहे. परंतु, आपण आपला मेंदू जास्त प्रमाणात धुवू शकत नाही, मग आपण काय करू शकता?

पार्किन्सन्स आजाराच्या लोकांना खास आरोग्यासाठी टिप्सः-

· या आजाराशी लढण्यासाठी डॉक्टर, एक परिचारिका आणि फिजिओथेरपिस्ट आणि गृह सहाय्यकासह आपली काळजी घेणारी टीम तयार करा

· औषधांचा साठा व्यवस्थित करा आणि या औषधांचे नियमित सेवन करा

· नियमित व्यायाम करा

· उत्तम आरोग्यासाठी तणावमुक्त आयुष्य जगा

· आपल्या आयुष्यातील तणाव आणि चिंता कमी करण्याचे मार्ग शोधा.

टीव्ही वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये कोरोनासंदर्भात ऐकल्यावर आपल्यालाही कोविड-19 हा आजार झाला तर अशी फक्त कल्पना जरी केली तरी मला चिंता वाटते. या प्रकारची माहिती प्रत्येकासाठी चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे आपण किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती पार्किन्सन्स आजारासह जगत असाल तर मेंदूमध्ये रासायनिक बदल घडवून आणणाऱ्या आजारामुळे आपण जास्त काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी नेमकं काय करणे आवश्यक आहे हे खालीलप्रमाणे सूचना केल्या आहेत.

1) औषधांसाठी नवीन प्रिस्क्रिप्शन मिळविण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी ऑनलाइन भेट देऊन संपर्क साधा. आपण निरोगी राहण्यासाठी सामान्यत: जे करत आहात ते करत रहा. जर आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्या डॉक्टरांना पाहिले तर आपल्याला काय वाटते हे आपण त्यांच्याबरोबर शेअर करा.

२) विषाणूचा प्रसार होऊ नयेत, यासाठी सर्व व्यायाम शाळा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी नियमित घरीच व्यायाम करा. याशिवाय एखाद्या मित्राला कॉल करा किंवा एकत्र व्हर्च्युअल व्यायाम वर्ग सुरू करा. हास्य हे एक औषध आहे. त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवून वावरत रहा. जेणेकरून तुमचे आरोग्य स्वास्थ्य उत्तम राहील. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा सर्व सुरळीत होईल. तेव्हा हे दिवस आठवणीत राहतील.

३) सध्या एकमेकांना भेटण शक्य जरी नसले तरी कॉल, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुप नेटवर्किंगद्वारे मित्रपरिवारांशी संपर्कात रहा. कारण सदयस्थितीत अनेक व्यक्ती मानसिक दडपणाखाली आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्यास हा तणाव दूर करता येऊ शकतो.

४) बातम्या पाहण्यापासून थोडी विश्रांती घ्या. वेळ घालवायचा असल्यास एखादे पुस्तक वाचा, एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा किंवा स्वयंपाक घरात जाऊन एखादी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here