पालघर: साधू हत्याकांड प्रकरणी आणखी ३ कर्मचारी निलंबित!

0
367

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील गडचिंचलेसह आजूबाजूच्या गावातील लोकांच्या जमावाने चोर असल्याच्या संशयातून दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची हत्या केली होती. यानंतर कासा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एका पोलीस उप निरीक्षकास तात्काळ निलंबित केल्यानंतर आज पुन्हा ए. अस. आय. साळुंखे, हवालदार संतोष मुकणे, नरेश धोडी या ३ पोलिस कर्मचाऱ्यांची चोैकशी करुन पोलीस अधीक्षक गौरव सिंग त्यांच्या निलंबनाचे आदेश यांनी दिले आहेत.

आत्तापर्यंत या प्रकरणात २ अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मंगळवारी याच प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कासा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवत बदली केली आहे. दरम्यान या हत्याकांडातील ११० आरोपींना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पकडण्यात आले असून इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस दल ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here