पालघर: तिघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 38वर..!

0
433

पालघर – योगेश चांदेकर:

काल एकाच दिवशी चार कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. आज दुसऱ्या दिवशी पालघर ग्रामीण भागातील 4 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. आज सकाळी वसई तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

अंजनी नगर वाडा येथील रहिवासी असणाऱ्या ३३ वर्षीय इसमाची उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सिद्धेश्वर रोड वाडा येथील रहिवासी असणाऱ्या २२ वर्षीय स्त्रीचा रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आढळून आली.

तसेच गो-हा येथील १२ वर्षीय मुलीची तिचा पनवेल येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जिल्ह्याची रुग्ण संख्या 301 वर, यांपैकी 14 जणांचा मृत्यू तर 154 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 38वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here