पालघर: डहाणूतील आणखी 4 जणांना कोरोनाची लागण; तालुक्यातील रुग्णांची संख्या 7 वर!

0
426

पालघर – योगेश चांदेकर:

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षाच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील रानशेत भागातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रानशेत ओझर पाडा येथील ४५ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, ७ वर्ष व ३ वर्ष वयाच्या दोन मुली असे एकूण ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या व्यक्ती काटाळे येथील वीटभट्टीवरून परतल्या असल्याने ३ वर्षीय रुग्णाचे जोखमीचे सहवाशित म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यामुळे आता डहाणू तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या आता 7 झाली आहे.

गंजाड येथील ३ वर्षीय मुलीच्या संपर्कात आल्याने या चारही जणांचे स्वॅब सॅम्पल कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. डहाणू तालुक्यातील संपर्कात आलेल्या एकूण 12 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले त्यापैकी 4 जणांचे पॉजिटिव्ह तर इतर 8 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा 12 जणांचे रिपोर्ट आले त्यापैकी4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चारही कोरोना बाधितांना बोईसर येथील टिमा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here