देव तारी त्याला कोण मारी; पाच मच्छिमार बचावले..!

0
444

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर घिवली येथील दर्शन पाटील यांची उद्धारी माता प्रसन्न बोट खडकावर आदळल्यामुळं समुद्रात बुडाली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. बोटीमध्ये असलेल्या पाचही मच्छीमारांनी खडकांचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला.

शुक्रवारी सकाळी डहाणू तालुक्यातील दांडी भागातील मासेमारांनी अपघातग्रस्त बोट आणि अडकलेल्या मच्छीमारांना सुखरूप किना-यावर आणलं. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे पाचही मच्छीमार सुखरूप बाहेर आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here