MUMBAI e NEWS:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- वीज महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षात ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार देणारा व सरासरी २०.०४ टक्के वीज ग्राहकांवर दर वाढ लढणार प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. महाराष्ट्रातील वीज दर वाढ ही इतर राज्यातील वीज दरा पेक्षा जास्त आहे, या दरवाढी विरोधात कायदेशीर लढदेण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या पालघर विभागा मार्फत जिल्ह्यातून २७ जानेवारी पासून सह्याची मोहीम
राबविण्यात येणार आहे.

नवीन प्रस्तावित २०.०४ टक्के ही वीज दरवाढ शेती पंप, सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक, तसेच अन्य वीज ग्राहक, आणि औधोगिक वीज ग्राहक यांचे कंबरडे मोडणारे आहे.

महा वीजनिर्मिती, परिवहन व वितरण या वीज कम्पनीच्या कारभारात कार्यक्षमता आणून वीज गळती, वीज चोरी व भ्रष्टाचार दुर करण्या पेक्षा वीज दरवाढ हा सर्वसामान्य माणूस व ग्राहकांवर अन्याय करणारा महा वितरण कंपनी मार्ग अवलंबू पहात आहे,

नवीन सरकारने त्वरित या प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात हस्तक्षेप करावा व फेर विचार करून निर्णय घेण्यासाठी हा संपूर्ण प्रस्तावच रद्द करावा अथवा मागे घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटने तर्फे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी केले आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या पालघर विभागातर्फे पालघरचया रेल्वे स्थानका जवळ दि, २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सह्याची मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी व ग्राहकांनी वीज महावितरण च्या प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या सह्याची मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश लवेकर यांनी संघटने तर्फ केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here