जागतिक महिला दिनानिमित्त आजी-माजी विद्यार्थ्यांनी राबवला स्तुत्य उपक्रम

0
515

पालघर-योगेश चांदेकर:

पालघर-विरार पूर्वेतील खानिवडे भागात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बी. एम.एम च्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत जिल्हा परिषद शाळा भारोळ येथे महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले. यावेळी पथनाट्य सादर करून आदिवासी महिलांमध्ये सॅनिटरी पॅड बाबतचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात अनेक आदिवासी महिलांनी सहभाग घेतला.

मासिक पाळीविषयी आदिवासी महिलांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांचे निराकारण करण्यासाठी खानिवडे केंद्रातील भारोळ गावातील जिल्हा परिषद शाळा भारोळ मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, वसई २ तर्फे आज ८ मार्च महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आजी- माजी विद्यार्थी व बी.एम.एम शाखेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आदिवासी महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मासिक पाळी बाबत जनजागृती केली.

विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्य संदर्भात आज असंख्य योजना अस्तित्वात असताना देखील जुन्या रुढी परंपरा मुळे आजही त्यांच्या मासिक पाळी दरम्यान घाणेरडा असा कपडा वापरतात.ज्यामुळे त्यांना विविध आजार उद्भवतात. यामुळे या आदिवासी महिलांना रोगापासून बचावासाठी व त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी या आजी- माजी विद्यार्थी व बी.एम.एम च्या विद्यार्थ्यांनी मासिक पाळी व सॅनिटरी पॅड बाबत जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केली. यामधून महिलांनी सॅनिटरी पॅड वापरा बाबतचा महत्वपूर्ण संदेश घेतला. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व आदिवासी महिला व शालेय मुलींना सॅनिटरी पॅड चे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास शेकडोच्या वर महिला व मुलींनी हे सॅनिटरी पॅड हाती घेत आपले आरोग्य सुदृढ राहण्याच्या दिशेने पाऊले उचलली.

सदर उपक्रम यशस्वी करण्यास सेवा सहयोग फाऊंडेशन अक्षय वने, बळीराम कवळी व जिल्हा परिषद भारोळ शाळेचे मुख्याध्यापक मनोज राऊत व शिक्षकांचा मोठा हातभार लागला. त्याचबरोबर शिक्षिका रुक्सार शेख, पत्रकार पंकज राणे, पत्रकार प्रशांत गोमाणे, शिक्षक राष्ट्रपाल काकडे, संचिता दशवंतराव, कौस्तुभ दशवंतराव व सर्व बी.एम.एम विद्यार्थ्यानी हा उपक्रम यशस्वी करण्यास अथक मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here