डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील – डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची दुपारी 2च्या सुमारास घटना घडली. अमित वनश्या कोठारी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अमित हा संतोषी येथील आश्रमशाळेत 10वी इयत्तामध्ये शिक्षण घेत होता. कोरोनाचा काळ असल्याने सध्या शाळा बंद असल्याने गावाशेजारी असलेल्या खदानी मधील साचलेल्या पाण्यात मित्रासंह दुपारी 2 वाजता गेले होते. त्यानंतर पाचही जन पोहायला उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अमितचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातील चार मुलं सुखरूप बाहेर निघाले.
डहाणू तालुक्यातील मणिपूर येथे खदानी मध्ये पाणी आहे. या खदानी मध्ये पोहोण्याचा मोह या शालेय विद्यार्थ्यांना आवरता आला नाही आणि तो तलावात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अमित घोडा व पोलीस घटना स्थळी पोहचले. व बुडालेल्या मुलाची युद्धपातळीवर शोधाशोध सुरू झाली. अखेर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अमितचा मृतदेह सापडला.