हेल्थ टिप्स : आवळा एक वरदान आहे.. जाणून घ्या आवळा सेवनाचे आरोग्यासाठी हे चमत्कारिक फायदे

0
718

मुंबई ई न्यूज नेटवर्क: वाचकहो आम्ही आपल्यासाठी बातम्यांसोबतच इतर महत्वपूर्ण दर्जेदार माहिती घेऊन येत असतो. आजीबाईचा बटवाच्या (aajibaicha batava) या भागात आपण आवळा सेवनाच्या फायद्यांविषयी(health benefits of aamla/aawla) सविस्तर माहिती घेणार आहोत. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो. आवळ्याच्या आहारातील वापरासंबंधी (use of aawla) हजारो वर्षांचा इतिहास आहे. आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत.

आरोग्याचे फायदे:
आवळ्यात असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे यांचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत(health benefits of antioxidants and vitamins in amla). आवळामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते शरीराला आजारातून बरे होण्यास मदत करते. आवळा बेरीमध्ये बर्‍याच फ्लेव्होनोल्स, रसायने असतात ज्यामुळे स्मृतीत सुधारणा होते. पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि याबरोबरच आता डायबेटिस, कॅन्सरसाठी देखील आवळा सेवन केले जाते.

आवळा काही ठळक आरोग्य फायदे:

उत्तम पचन(Better Digestion):

आवळ्यात असणारे फायबर शरीरात आतड्यांसंबंधी अनेक तक्रारींवर गुणकारी आहे. व्हिटॅमिन सीचे उच्च प्रमाण आपल्या शरीरास इतर पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते, म्हणून जर आपण लोह आणि इतर खनिज पूरक आहार घेत असाल तर ते उपयुक्त ठरू शकतात.

निरोगी डोळे(Healthier Eyes):

डोळ्यांच्या आरोग्य सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अ जीवनसत्व आवळ्यात() मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आवळ्याचे सेवन हे डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए केवळ दृष्टी सुधारत नाही तर वाढत्या वयासोबत मॅक्युलर डिजनरेशन होण्याचा धोका देखील कमी करू शकतो. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (डोळा लाल/गुलाबी होणे) आणि इतर संक्रमणांपासून संरक्षण करते. आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारखे आजार दूर होतात.

मधुमेह नियंत्रण(Diabetes Control):

क्रोमियम तत्व आवळ्यामध्ये मोठया प्रमाणात असते. यामुळे शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. यांसह दुसऱ्या प्रकारचा मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील ग्लुकोज आणि लिपिड संख्येवरदेखील आवळा सेवनाचा सकारात्मक परिणाम होतो.

रोगप्रतिकारक शक्ती:

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवर अवलंबून असते. शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्याचे कार्य करते.

हाडांचे आजारामध्ये आराम:

आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. त्यामुळे आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. अर्थराईटीस, ऑस्ट्रोपोरोसिस आणि हाडांच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here