पालघर – योगेश चांदेकर:
डहाणू तालक्यातील आशागड पोलीस स्टेशनपासून काही अंतररावर पीकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका प्रिया प्रभाकर संखे (वय ५० वर्षे) व इतर एक (यशवंत गोरखना) असा दोघांचा उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.

सदर परिचारिका कामावरून घराकडे जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. परिचारिका प्रिया प्रभाकर संखे या गेल्या पाच वर्षांपासून ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत होत्या. त्यांच्या या अशा अपघाती मृत्यूने आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.