पालघर – योगेश चांदेकर:
मुबंई – अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडून गुजरातच्या दिशने जात असलेल्या मार्बलचा कंन्टेनरचा वेगावरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद असल्याने मोठा अनर्थ टळला, सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटविण्याचे काम सुरु केले. चालकाचे वेगावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी तपासात नमूद केले आहे.