पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवन नजीक भीषण अपघात; एकाचा मृत्यू..!

0
431

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवन नजीक ड्रायव्हरचा वेगावरुन ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला आहे. मिळालेल्या माहीती नुसार सदर MH04HM1704 क्रमांकाची वॅगेनाॅर गाडी ही मुंबईवरुन गुजरातच्या दिशेने जात होती. त्या गाडीत ३ पुरुष व १ महिला होती. गाडी मालक स्वतः गाडी चालवत होता अशी माहिती मिळाली आहे.

वेगावर नियंत्रण सुटल्याने गाडी ने पलटी खाल्याने त्यांना जबर मार लागुन त्यांचा जागीच मृत्यु झाला. पोलीसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत असणाऱ्या महिलांना डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालाय येथे दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here