ब्रेकिंग: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवन येथे कारची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू दोघेजण गंभीर जखमी

0
359

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मेंढवन येथे हा अपघात झाला. अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये 3 जण होते त्यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी आहेत.

साधारणतः २८ वय असणाऱ्या चालकाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here