पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरण; आरोपीचे वाहन जप्त, बँक खातेही गोठवले

0
472

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी आरोपी गणेश किसन आडगा याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील तवा भागातील साक्षीदारांनी आरोपी आडगा यास १८ लाख रुपये दिले असल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात तपास यंत्रणांना महत्वपूर्ण पुरावे हाती लागल्याचे समजते. आरोपी आडगा याचे वाहन पोलीसांनी जप्त केले असून त्याचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणातील १० आरोपींपैकी ६ जणांना अटक करण्यात आली असून ४ आरोपी अद्याप फरार आहेत. आत्तापर्यंत एकूण ६१ बाधित शेतकऱ्यांनी आरोपींविरोधात जबरदस्तीने लुबाडणूक केल्याची तक्रार नोंदविली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे तपासासाठी येत असलेल्या मर्यादा, गुन्ह्याची एकूण व्याप्ती व स्वरूप आणि आरोपींच्या समर्थकांनी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना दिलेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर पोलीसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here