पालघर: मुदतबाह्य सॅनिटायजर वाटप प्रकरणी ‘त्या’ ग्रामसेवकास कारवाईचा झटका

0
321

जव्हार प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी जव्हार यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथील ग्रामसेवक गणेश वामन एकल यांचे कामात बेजाबदारपणा व हयगय झाल्याने त्यांच्यावर एकवर्षासाठी वार्षिक वेतनवाढ बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामसेवक गणेश वामन एकल यांनी मालाची वैधता न तपासणे, वाटपा बाबत अतिघाई, साठा नोंद वहीत नोंद न घेणे, ई टेंडरिंग न करता कोटेशन पद्धतीने खरेदी करणे अशा प्रकारे बेजबाबदारपणा,निष्काळजी व हयगय झाल्याचे आढळून आले. ग्राम सेवकाने दुर्लक्ष केल्यामुळे जनतेच्या आरोग्या बाबतच्या प्रश्नाबाबत निष्काळजी पणा असे आरोप ठेवण्यात आले. ग्रामसेवक एकल यांना म.जि.प.जि.से. (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करून आपले कर्तव्य परायणता, जबाबदारी यात कसूर केलेली असल्याने म. जि.प.जि.सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (२) नुसार एकल यांची एक वार्षिक वेतन वाढ (परिणाम न करणारी) बंद करण्यात आली असल्याचे गट विकास अधिकारी जव्हार यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here