पालघर IMPACT । ‘त्या’ प्रकरणांतील दोषींवर कारवाई करण्यात येईल – मुख्यवनसंरक्षक नरेश झुरमुरे

0
400

पालघर – योगेश चांदेकर:

गुजरातमधील अंकलेश्वर येथून मुंबईच्या दिशेने स्पाइनवुडची वाहतूक करत असलेल्या कंटेनर ट्रेलरला २३ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास डहाणू तालुक्यातील चारोटी टोल नाक्याच्या पुढे पोलीसांसोबत बंदोबस्तास असणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडविले होते. वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहन चालकावर वन गुन्हा दाखल करून व निर्धारित दंड वसूल करत त्याला पुढील प्रवासासाठी पास अदा करणे अथवा स्पाईन वुडच्या अवैध वाहतुकीसंबंधी कारवाईसाठी सदर वाहन ताब्यात ठेवणे गरजेचे होते. असे असताना डहाणू येथील सहाय्यक वनसंरक्षक राहुल मराठे यांच्या तोंडी आदेशावरून वन परिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील यांनी कोणतीही कारवाई न करता सदर वाहन गुजरातच्या दिशेने परत पाठवले होते. याबाबतची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर डहाणू उप वनसंरक्षक विजय भिसे यांनी याप्रकरणाची मोबाईल पथक वनपरिक्षेत्र अधिकारी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून चार्जशीटच्या आधारे मंजुरीसाठी सादर करत एसीएफला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचे उत्तर प्रतीक्षेत असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती विजय भिसे यांनी दिले आहेत.

चारोटी प्रकरणाच्या अगदी उलट असा मनमानी कारभार करत वन विभागातील अधिकाऱ्यांनी बोर्डिं वनपरिक्षेत्र हद्दीतील तलासरी वनोपज तपासनी नाका येथे ट्रक अडवला होता. तो ट्रक २० दिवस कोणत्याही कारवाईविना अडवून ठेवण्यात आला होता. बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक करणारे एखादे वाहन अडवल्यास त्यावर वन गुन्हा दाखल करून वरिष्ठांना कळवणे क्रमप्राप्त असताना याप्रकरणाची माहिती वरिष्ठांना मिळाली नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी आरएफओ मोबाइल पथकास चौकशीचे आदेश दिले असून अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती डहाणू उप वनसंरक्षक विजय भिसे यांनी दिली आहे. एकूणच अतिशय अनाकलनीय व मनमानी पद्धतीने हि कारवाई करण्यात आलेली आहे, बोर्डिं पनपरिक्षेत्र हद्दीतील तलासरी वनोपज तपासनी नाका येथे ट्रक अडवला होता, त्यानंतर पुन्हा तो ट्रक तिथे न लावता प्रथम डोल्हारपाडा येथे व नंतर पुन्हा अच्छाड येथे असा नेण्यात आला. जप्त केलेला ट्रक एकठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी नेण्यासंबंधी वरिष्ठांना कळविले होते का? जप्त केलेल्या मुद्दे मालाची माहिती वरिष्ठांना कळविली होती का? या सर्व गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे. दप्तर दिरंगाई हि अर्थपूर्ण देवाणघेवाण होण्यासाठी तर करण्यात येत नव्हती ना हे समोर येणे गरजेचे आहे. तसेच वारंवार मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चाप बसणे गरजेचे आहे.

“बोर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील तलासरी वनोपज तपासणी नाका येथे २० दिवसांपासून ट्रक अडवण्यात आला आहे, अधिकाऱ्यांनी विचारपूर्वकच हि कारवाई केली असेल मात्र तरीही जर यामध्ये कोणी दोषी असेल तर कारवाई करण्यात येईल. तसेच चारोटी प्रकरणाची चौकशी सुरु असून अहवाल प्राप्त होताच कडक कारवाई करण्यात येईल.” – नरेश झुरमुरे, मुख्यवनसंरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here