पालघर: ‘टिमा’ला सलग ३७ दिवस कार्यरत देवदूताचं नागरिकांकडून उस्फुर्त स्वागत..!

0
444

पालघर – योगेश चांदेकर:

टिमा हॉस्पिटल आयसोलेशन युनिटला लॅब तंत्रज्ञ ऑफिसर असणाऱ्या डहाणू शहरातील जोशी नगरमधील डॉ. विजया विनोद माहेश्वरी या सलग ३७ दिवस कोरोना रुग्णांना सेवा देऊन आपल्या घरी परतल्या. २४ मार्च ते २ मे पर्यंत त्यांनी कोरोनाग्रस्तांना सेवा दिली. यावेळी त्यांच्या घरी येण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जोशी नगर, इंटिग्रेट रोड व अनंतधाम बिल्डिंग मधील रहिवाशांनी त्यांचे उस्फुर्तपणे स्वागत केले. टाळ्यांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत भागातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

काल टिमा रुग्णालयातील ९ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्या रात्री ८ वाजता घरी पोहोचल्या. उपस्थितांकडून विजया माहेश्वरी यांना मिठाई भरवून, पुष्पहार घालून औक्षण करत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांकडून सोशल डिस्टंसिंगच्या सूचनांचे पालन करण्यात आले.

“आम्ही तुमच्यासाठी, देशासाठी निष्ठेने रुग्ण सेवा केली व करत राहू. आपण सर्वांनी घरी राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. देशावर आलेल्या संकटावर मात करून कोरोना मुक्त भारत घडवू या.” – डॉ. विजया माहेश्वरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here