पालघर: ‘मुर्दाड’ प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषणाच्या जोडीला आता धरणे आंदोलन

0
330

मुंबई ई न्यूज नेटवर्क: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण जाणीवपूर्वक स्थगित करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पिडीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. पिडीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास बसलेल्या आपल्या शेतकरी बांधव, सामजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू यांना पाठिंबा देण्यासाठी १४ स्पटेंबर पासून पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या ७ स्पटेंबर पासून रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसलय. परंतु आमरण उपोषणाचा ६ वा दिवस संपत आला तरी प्रशासनाने उपोषणास गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. उपोषणाला बसलेल्या काही जणांची प्रकृती खालावली असून देखील प्रशासनाने आपला मुर्दाडपणा सूरू ठेवला असून जाणीवपूर्वक उपोषण स्थगित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा डाव असल्याची तक्रार शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

सदर उपोषणात सामाजिक कार्यकर्ते विजय वझे, मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर तसेच इतर आठ पिडीत शेतकरी सहभागी आहेत. या उपोषणाला पालघर, ठाणे व रायगड़ जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत हे उपोषण सूरू असताना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात ऩसल्याने सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणे आंदोलना संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आले असून आपत्तीजन्य परिस्थीतीत शासनांच्या नियमांचे पालन करून सदरचे आंदोलन केले जाणार असल्याचे पिडीत शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here