पालघर: मोफत वाटण्यासाठी दिलेल्या तांदळाची २२ रुपये किलो प्रमाणे विक्री; गावकऱ्यांचा आरोप..!

0
535
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पालघर – योगेश चांदेकर:
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. गरजुंना दोनवेळेचे घास मिळावे यासाठी अनेक दानशूर लोक पुढे येत आहेत. याउलट केंद्र सरकारने मोफत वाटण्यासाठी दिलेल्या तांदळाची रेशन धान्य दुकानदार २२ रुपये किलोप्रमाणे विक्री करत असल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील राई या गावात घडली आहे. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी तहसिलदार डहाणू यांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान सदरच्या तक्रारीबाबत तहसिलदारांना विचारले असता त्यांनी अशाप्रकारची तक्रार मिळाली असून चौकशी सुरु आहे असे सांगितले.

रेशन धान्य दुकानदार व त्याचा वितरक हे संगनमताने हा अपहार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धान्य वाटप करण्याऐवजी त्याची विक्री करत त्यांना अशासकीय बिल देण्यात आले होते जे नंतर परत घेण्यात आले. दरम्यान या प्रकारची शहानिशा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सदर प्रकार जर खरोखर घडला असेल तर तो अतिशय निंदनीयच म्हणावा लागेल. अशा संकटाच्या परिस्थितीत जर माणुसकीला धक्का लावणारे कृत्य होत असेल तर त्यांच्याविरुद्ध कडक शासन करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे.

  • “मोफत वाटण्यास दिलेल्या तांदळाची विक्री झाली असल्याची तक्रार मिळाली आहे. पुराव्यादाखल जोडलेली पावती हि एका शाळेची आहे. त्यामुळे यामागचे तथ्य तपासून पुढील कारवाई केली जाईल.” – राहूल सारंग, तहसिलदार डहाणू

  • “मोफत वाटण्यासाठी आलेले धान्य शेकडो लोकांना २२ रुपये किलो याप्रमाणे विक्री केली आहे. याबाबत वादावादी झाल्यानंतर लोकांना खोट्या पावती देण्यात आल्या व नंतर त्या परत घेण्यात आल्या. याबाबतची तक्रार तहसिलदार डहाणू यांना देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई केली जाईल अशी आशा आहे.” – विजय वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here