…तर सफाई कामगारांनाही करू द्या “वर्क फ्रॉम होम” -विवेक पंडित

0
477

कोरोना बाबत सफाई कामगारांच्या सुरक्षेचे काय?- विवेक पंडित यांचा सवाल

कामगारांना मास्क,ग्लोज ,शूज आणि सॅनिटायझर पुरविण्याची श्रमजीवीची मागणी

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-जगभर कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत, नोकरदार विद्यार्थी सामान्य माणसाच्या सुरक्षेची चर्चा तर होतेच पण सामान्य वाटणारे मात्र असामान्य असे काम करणाऱ्या महापालिका सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत चर्चा होताना दिसत नाही. अख्या समाजाचा कचरा, घाण गटारात उतरून स्वच्छ करणारा सफाई कामगार बांधव आपल्या आरोग्याला दावणीला लावत आहे. या कामगारांना कोरोना सारख्या गंभीर आजाराचा प्रभाव होऊ नये म्हणून काय उपाययोजना आहे? असा सवाल श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला आहे. सर्वत्र लॉक डाऊन करत शासकीय तसेस खाजगी आस्थापनामधील अधिकारी कर्मचारी यांना “वर्क फ्रॉम होम”ची मुभा देण्याची घोषणा शासनाने केली आहे या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांनादेखील “वर्क फ्रॉम होम” ची मुभा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. हे कामगारही माणसं आहे याचाही विचारही शासनाने करावा असेही पंडित म्हणाले.

या सर्व नगरपालिका, महापालिका सफाई कामगारांना तातडीने हँड ग्लोज, मास्क, शूज आणि पुरेसे सॅनिटायझर देण्यात यावे अशी मागणीही पंडित यांनी केली आहे.हे देण्यास शासन प्रशासन असमर्थ असेल तर “वर्क फ्रॉम होम” हाच पर्याय लागू करावा असे पंडित म्हणाले.

श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी, मीरा भाईंदर, वसई महापालिका तसेच जव्हार पालघर डहाणू इत्यादी नगरपालिका मध्ये सभासद कामगार आहेत. या कामगारांच्या न्याय हक्कासाठी श्रमजीवी नेहमीच लढत असते. कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उपाययोजना आणि काळजी घेतली जात आहे, अनेकांना तर वर्क फ्रॉम होम चा ऑप्शन दिला आहे, मात्र आपला जीव धोक्यात टाकून गटारात उतरणार, रस्त्यावर झाडू मारणार माझा सफाई कामगार देखील माणूस आहे त्यालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून त्यालाही “वर्क फ्रॉम होम”ची मुभा द्यावी अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे. संघटनेचे सभासद आहेत त्या महापालिका नगरपालिका यांच्या सह सर्वच ठिकाणी असलेल्या सफाई कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच ठिकाणी कामगारांना वर्क फ्रॉम होम ची मुभा द्यावी अशी श्रमजीवीची मागणी आहे.

यापैकी 32 नागरिक हे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातले आहेर तर 54 नागरिक पालघर ग्रामीण क्षेत्रातले आहेत या 86 नागरिकांपैकी 19 नागरिकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असून यामधील 10 नागरिक हे लक्षणे आढळलेले आहेत या दहा नागरिकांपैकी चार नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सहा नागरिकांच्या तपासणी अहवाल अजूनही आलेले नसल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील 50 टक्के खाटा उपलब्ध करून घेण्यात आल्या असून टिमा रुग्णालय ही यासाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहे महानगरपालिका क्षेत्रातील 283 खाटा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत सर्व ती उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन संपुर्णरित्या प्रयत्नशील असून नागरिकांनी स्वतःची नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले

या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अधिकारान्वये त्यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित अधिनियम 144 लागू केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली अधिनियम 144 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार जीवनावश्यक वस्तू खरेदी सोडून बंद ठेवण्यात येण्याच्या सूचना तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे देवस्थानाच्या पुजाराकडून केली जाणारी वयक्तिक पूजा सोडून जिल्ह्यातील इतर सर्व पर्यटन स्थळे ,धरणे, तलाव,किल्ले आदी ठिकाणी 31 मार्चपर्यंत मज्जाव असल्याचे या कलमान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे

पालघर जिल्ह्यात विविध औद्योगिक वसाहतींमध्ये दोन लाख 28 हजार कामगार असून अत्यावशक बाबी सोडून सर्व औद्योगिक वसाहतींना आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना जील्हाधिकार्‍यांनी या निमित्ताने दिलेला आहे तसेच उद्योगातील कार्यरत असणारे कर्मचारी यांचा एकमेकांशी दैनंदिन संपर्क येत असून कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या व्यक्ती पासून इतर कामगारांना संसर्ग होऊ नये याची दक्षता म्हणून आस्थापनातील कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत उद्योग कारखाने कंपन्या यामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत यावेळी दिली यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा संचालनालय तसेच कामगार उपायुक्त यांना त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्यासाठी सूचित करण्यात आले आहे

जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्हा मुख्यालय राहणे आवश्यक असल्याचे निर्देशही त्यांनी यावेळी सांगून जे अधिकारी-कर्मचारी आपल्या जिल्हा मुख्यालयात हजर राहणार नाही अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली जिल्ह्यात यात लोकप्रतिनिधींनी कुठलेही गर्दी जमतील असे कार्यक्रम घेऊ नये तसेच प्रशासकीय कार्यालयातील सर्व भेटी पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले नागरिकांना कोणत्याही तक्रारी असल्यास या तक्रारी दूरध्वनी किंवा मेलद्वारा संपर्क करून द्याव्यात यावर येत्या सात दिवसात योग्य ते निर्णय घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी पत्रकारांसमोर सांगितले जिल्ह्यात 21 मार्च रोजी होऊ घातलेली किनारा व्यवस्थापन आराखडा संबंधीची जनसुनावणी ही रद्द करण्यात आल्याची त्यांनी सांगितले

करोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी एकमेकांचा संपर्क टाळण्याचे आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी यांनी जिल्हावासीयांना केले आहे आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी तसेच एकमेकांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here