त्या भूमीपुत्रांच्या नोकरीसाठी आंदोलन सुरू; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

0
420

पालघर – योगेश चांदेकर
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये भूमीपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. या मागणीसाठी स्थानिक विद्यार्थी व शिक्षक, शिपाई, बेरोजगार या सर्वांनी डहाणू येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. डहाणू प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील रिक्त पदावर स्थानिकांना प्राधान्य द्यावे याकरिता हे उपोषण सुरु आहे.

आमदार काॅ. विनोद निकोले यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याअगोदर याच मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देत तीव्र आंदोलन करण्याचे स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here