पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; आणखी १७ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार

0
334

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानभरपाई रक्कमेपैकी ३५% रक्कम लुबाडणुक केल्याप्रकरणी आत्तापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली. आज डहाणू तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली लुबाडणूक झाल्याबाबत जबाब नोंदविला आहे. शुक्रवारी पाच फरार आरोपींपैकी एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. दरम्यान आत्तापर्यंत या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली असून अद्याप चार आरोपी फरार आहेत. आरोपीच्या समर्थकांकडून बाधित शेतकऱ्यांमध्ये दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना देखील शेतकरी निर्भीडपणे पुढे येत आहेत याच सर्वस्वी श्रेय हे तपास यंत्रणेने निर्माण केलेल्या विश्वासाला जातं.

सध्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्यास मदत केल्याचे सांगत आरोपी कसे योग्य आहेत हे पटवून देण्याचे काम काही मंडळी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे कि समाजकार्य हे कधीच पैसे घेऊन केले जात नाही. घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक काम करणारे कुठे अन शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे जबरदस्तीने लुबाडणारे संधीसाधू कुठे? असा सवाल या निमित्त्ताने निर्माण होतो. येत्या काळात याप्रकरणी अनेक धक्कादायक नावे पुढे येतील अशी शक्यता काहीजण बोलून दाखवत आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सांगीव गोष्टींना बळी न पडता निर्भीडपणे पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन मुंबई ई न्यूज वारंवार करत आहे.

पोलीस अधिकारी यांची नावे संपर्क क्रमांक:
प्रशांत परदेशी, पोलीस उपअधीक्षक आर्थीक गुन्हे शाखा पालघर – ८८८८८०८३२५
विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी; पालघर – ८८०५८१३३५३
प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा, पालघर – ९९७५१२१२१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here