पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांचे चोरीस आळा घालण्यासाठी तसेच चोरीस गेलेल्या चार चाकी
वाहनांची माहीती काढून वाहन चोरी करणारे टोळीचा शोध घेण्याबाबत गौरव सिंग, पोलीस अधीक्षक, पालघर
यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनाखाली
बोईसर यूनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हयातून चोरीस गेलेल्या महिंद्रा पिकअप व महिंद्रा मॅक्स या
गाडयांची माहीती संकलीत करुन तांत्रिक तपास करुन महिंद्रा पिकअप व महिंद्रा मेंक्स या वाहनांची चोरी करुन
त्यांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तसेच स्पेअर पार्ट बदली करुन विक्री करणारे एकूण ७ आरोपी
निष्पन्न करुन त्यांचा शोध घेवून त्यांना डहाणू पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ३७/२०१९ भा.दं.वि.सं.कलम ३७९
४६५, ४६८, ४७१, ३४ या गुन्हयात अटक केली आहे.

अटक आरोपींकडे केलेल्या तपासादरम्यान त्यांनी दिवसा पिकअप वाहनांचे पार्कीग ठिकाण्याची माहीती घेऊन रात्रीचे वेळी बनावट चावीने पिकअप वाहने चोरी करुन ती भिवंडी येथील गेरेजवर नेवून तेथे मुळ वाहनाची नंबरप्लेट काढून टाकून त्याचा इंजिन नंबर व चेसिस नंबर ग्रायंडर मारुन नष्ट करीत असत.
भंगारमध्ये तोड़ण्यात आलेल्या वाहनांचे मुळ पेपरवरील इंजिन नंबर व चेसिस नंबर पंच करीत असत च मुळ
वाहनाची बॉडी, शो, व इतर भागात घदल करुन २ ते ३ लाख रुपयांत वाहनाची विक्री करीत असत. तसेच
वाहनाचे सुटे पार्टस करुन ते जुन्या बाजारात विक्री करीत असत. तसेच रोड लगत पार्कीग पिकअप वाहनांचे
रात्रौचे वेळी स्पेअर पार्टस तसेच मोकाट जनावरे चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नमुद आरोपीनी पालघर जिल्हयातून ५१ पिकअप वाहने, ठाणे आयुक्तालय मधील कापुरबावडी येथून ।
पिकअप वाहन, गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयातून २ पिकअप वाहने, दादरानगर हवेली येथून १ पिकअप
वाहन असे एकुण ५५ पिकअप वाहनांची, ५ ठिकाणाहून पार्कीगमधील चार चाकी वाहनांचे स्पेअर पार्टस तसेच
०४ ठिकाणाहून मोकाट जनावरांची चोरी असे एकूण ६४ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी २७
पिकअप वाहने आरोपींकडून डिटेक्ट केली आहेत. त्यामध्ये १९ महिंद्रा पिकअप,०६ महिंद्रा मॅक्स, ०२ पिकअप
टोईन हॅन असे आहेत.
अटक आरोपींनी गुजरात राज्यातील वलसाड जिल्हयात तसेच दादरा नगर हवेली या केंद्र शासीत प्रदेशात
देखील वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींची दि.२०/०२/२०२० रोजी पायेतो पोलीस
कोठडी रिमांड मंजूर असून आरोपींकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर युनीटचे सहा.पोलीस
निरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेलर, सफौज.विनायक ताम्हाणे, सफौज, सुनिल
नलवडे, दिपक राऊत, संदीप सुर्यवंशी, नरेंद्र पाटील, निरज
शुक्ता, नरेश जनाठे यांचे पथकाने केली आहे.