रिलायन्स गॅस पाईलाईनबाधित प्रकरण : फरार आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन..!

0
420

पालघर – योगेश चांदेकर :
रिलायन्स गॅस पाईलाईन बाधित प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणातील चार आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्याकडून बाधित शेतकऱ्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

दरम्यान रिलायन्स गॅस पाईलाईनबाधित प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कमलाकर शिंदे यांनी केलेला जामीन अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणात आरोपींच्या यादीत नावच नसताना कमलाकर शिंदे याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपपत्रात नाव नसताना देखील शिंदेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने त्यांचा गुन्ह्यात महत्वपूर्ण सहभाग असल्याची शक्यता सरकारी पक्षाचे वकील अॅड. तरे तसेच खाजगी वकील अॅड. सुधीर गुप्ता यांनी वर्तवली होती. सरकारी पक्षाचा हा युक्तीवाद ग्राह्य मानून शिंदेचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

तसेच या प्रकरणात अटकेत असणारा आरोपी मधुकर काकरा याच्या जामीन अर्जावर देखील आज १७ ऑगस्ट रोजीच सुनावणी होती मात्र आरोपीच्या वकिलांकडून अर्ज मागे घेण्यात आला. या प्रकरणात अद्यापही चार आरोपी फरार आहेत. दरम्यान फरार आरोपींकडून बाधित शेतकऱ्यांना सतत धमकावले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here