पालघर: पोलीस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक; रतन टाटांशी संबंध असल्याचा मारायचा बाता

0
230

पालघर प्रतिनिधी – विनायक पवार:

पोलिस असल्याच खोटं ओळखपत्र तयार करून नागरिकांना व व्यावसायिकांना ठगणाऱ्या भामट्याला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलं आहे. पालिकेचा ठेकेदार असलेला हा व्यक्ती लोकांना पोलीस असल्याचं सांगून त्यांची फसवणूक करत होता. विरार वसई मधील काही नागरिकाना त्यानं लुटलंही आसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भामट्याने स्वतःच्याच वर्गमैत्रिणीला आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगून तिची आर्थिक लुट केली आहे.

पोरस विराफ जोखी असं या भामट्याचं नाव आहे. पोरस हा महानगर पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं महानगर पालिकेमध्ये कामाचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं सांगत त्यांच्याकडून या कामी मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत त्यानं अनेकांना गुंतवणूक करायला भाग पाडल. गुंतवणूक करणाऱ्यांनी काही दिवसांनी जेव्हा पैसे मागितले तेव्हा पोरस याने सर्वांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली.

आरोपी पोरसनं त्याचे फोटो दाखवून स्थानिक आमदार आणि उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत घनिष्ठ संबंध नागरिकांना सांगितले होते. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही, असं म्हणत तो लोकांना फसवत होता. पण पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून. या भामट्याने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here