केंद्रीयमंत्री आठवले यांच्याकडून मुंबई ई न्यूजच्या बातमीची दखल; परिचारिकांच्या त्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलणार!

0
422

मुंबई – योगेश चांदेकर:

नायर रुग्णालयातील परिचारिकांना एन-९५ मास्क, सुरक्षा किट अशा इतर सोई सुविधा देखील मिळत नसल्याची एक्सक्लुजीव बातमी मुंबई ई न्यूजने केली होती. या बातमीची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तात्काळ दखल घेत ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केलं. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालिका आयुक्त यांच्याशी याप्रश्नी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

राज्यात व देशात आरोग्य कर्मचारी जीवतोड मेहनत घेऊन कोरोनाशी दोन हात करत असताना ठीक ठिकाणी त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबई ई न्यूजने बातमी दिल्यानंतर या बातमीमुळे एकच खळबळ माजली होती. परिचारिकांना सेफ्टी किट देण्याच्या तसेच त्यांना इतरही सोयी सुविधा मिळाव्यात याविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलून हा प्रश्न सोडवू असही ते म्हणाले. ही धक्कादायक माहिती पुढे आणल्याबद्दल त्यांनी मुंबई ई न्यूजच्या टीमचे देखील कौतुक केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here