पालघर: सोनाळे गावात एका कुटुंबांवर हल्ला, एक महिला ठार!

0
535

पालघर – योगेश चांदेकर:

मंगळवारी पालघर जिल्हा डहाणु तालुक्यातील सोनाळे गावामध्ये पुन्हा मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. पहाटे ५.४५ च्या सुमारास अज्ञात इसमांनी एका कुटुंबावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सोनाळे गावात विलास वांगड हे आपल्या मुळ गावी आले असता २ अज्ञात इसमांनी चाकु व सुऱ्यानी त्यांच्यावर व कुटुंबातील इतर लोकांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांची पत्नी वैष्णवी विलास वांगड वय ३६ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्या मुलगा देखील या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.

सदर प्रकार हा आर्थिक व्यवहारातुन झाला असल्याची माहिती विलास वांगड यांनी दिली आहे असे समजते. अज्ञात इसमांना रोखायचा प्रयत्न केला असता सदर इसमांनी धारधार चाकुने पाठीवर, पोटावर वार केले. विलास वांगड यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मुलाला व त्यांच्या पत्नीला देखील धारदार चाकूने भोकसण्यात आले यामध्ये पत्नी वैष्णवी यांचा जागीच मृत्यू झाला असून विलास व त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जे. जे. हाॅस्पीटल मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्या अज्ञात इसमांचा शोध लवकरच पोलीस घेतील अशी माहीती कासा पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here