पालघर: वाढदिवसाचा खर्च टाळून चिमुकल्यांची PM आणि CM केअर फंडास मदत

0
438

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाविरोधातील लढाई सुरू असतानाच त्यासाठी आर्थिक निधीची चणचण होऊ नये म्हणून सरकारसह सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्योगपतींपासून सर्वसामान्य जनताही सहभाग नोंदवत आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील शिवाजीनगर मधील १६ वर्षीय साईराज प्रफुल्ल बोकंड आणि आदित्य प्रशांत बोकंड या भावंडांनी आपला वाढदिवस साजरा न करता पाच हजार हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तर २५०१ रुपयांची रक्कम PM Cares ला दिली आहे.

कोरोनाविरोधात देश उभा ठाकला असताना वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्या रक्कमेचा सदुपयोग करावा, असे साईराज व आदित्य यांच्या मनात येत होते. हा विचार त्यांनी पालकांसमोर मांडताच त्यांनी त्यास अनुमती दर्शविली. त्याप्रमाणे बोकंड कुटुंबीयांनी पाच हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तर २५०१ रुपयांची रक्कम PM Cares ला दिली आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here