पालघर जिल्हयातील चिंचले आश्रमशाळेत भुकंप जनजागृती प्रात्यक्षिक

0
435

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- आपत्ती व्यवस्थापन,भुकंप साक्षरता , सुरक्षा उपाय ही जनसामन्यांची चळवळ करण्याच्या धर्तीवर भुकंप जनजागृती अभियान अंतर्गत पालघर जिल्हयातील भुकंप प्रवण डहाणू तालुक्यामधील चिंचले तसेच धुंदलवाडी या दोन आश्रमशाळेत भुकंप साक्षरता भुकंप सुरक्षा उपाय’ आणि बचाव कार्य पद्धत अाणि प्रात्यक्षिकासह चार दिवसीय प्रशिक्षण पार पडले.डहाणू तालुक्यातील चिंचले धुंदलवाडी, तलासरी, दापचरी या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यास ‌आपत्ती व्यवस्थापन साक्षर तसेच भुकंप साक्षर करण्याचे मुख्य ध्येय ठेवुन या उपक्रमाची आखणी करण्यात आली.जिल्हाधिकारी कैलास शिंदे, डहाणू तहसीलदार राहुल सारंग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम,उल्हास केळकर,
यांच्या विशेष उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात केली.
नैसर्गिक हानी रोखणे, मानवी क्षमतेबाहेरचे आहे.हे मान्य करुन आपत्ती येण्यापूर्वी प्रशिक्षित होऊनजिवीत व वित्त हानी कमी करण्यासाठी वैयक्तिकरित्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.शिंदे यांनी व्यक्त केले.

भुकंप म्हणजे काय? तो का? आणि कसा होतो? भुकंपाची व्याप्ती अाणि परिण‍ाम, भुकंपापूर्वी, भुकंप होत असताना, भुकंप‍नंतर घ्यावयाची काळजी , शाळेत असताना घ्यायची काळजी, सुरक्षा उपाय, सुरक्षा पेटी २०० स्लाईड्स च्या मदतीने अद्य़ावत माहिती देण्यात आली. स्कुल ईव्हॅल्यूशन मध्ये संपूर्ण शाळा रिकामी करुन विद्यार्थ्यास सुरक्षित जागी नेणे.या विषयाची माहिती मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देऊन त्याचा सराव सर्व शिक्षकांनी करुन प्रत्येक वर्गामध्ये त्याचा सराव घेण्यात आला .वारंवार सराव केल्यानंतर ३ मिनीटाच्या अवधीत संपूर्ण शाळा रिकामी होऊ शकते याची अनुभुती शाळेने घेतली.भुकंपाच्या अनुषंगाने येणारे आपत्ती त्याची व्याप्ती चिंचले आश्रमशाळेतील ३५० विद्यार्थीनी आणि ३४० विद्यार्थीनींनी यामध्ये सहभाग घेतला. सुटका आणि मदत कार्य यामध्ये जखमींन‍ा बांधावयाची ५ बँडेजस, उचलून नेण्याच्या ६ पद्धती, उपलब्ध साधनांद्वारे २० सेकंदामध्ये तयार करायचे स्ट्रकचर्स,दोरीची शिडी तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थांना दिले.

चिंचले आश्रमशाळा येथे दि. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ४ दिवसीय प्रशिक्षण शिबीर
क‍ालावधीत पार पडले . यावेळी ६९० विद्यार्थी आणि विद्यार्थीनी लाभ घेतला. धुंदलवाडी आश्रमशाळा येथे . दि. 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी ह्या तीन दिवसांत आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम यांचा भूकंप आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग राबवण्यात आले. यावेळी प्रशिक्षक व मार्गदर्शक उल्हास केळकर यांनी प्रात्यक्षिक सादर केले.
धुंदकवाडी शाळेतील इयत्ता 1ली ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दि 18 फेब्रुवारी रोजी शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी मानवी स्ट्रेचर, शर्ट चा स्ट्रेचर, ओढणी पासून स्ट्रेचर, हाताच्या साहाय्याने रुग्णांना वाहून नेणे, रस्सी पासून शिडी बनवणे, 20 फुटा वरून उडी मारणे, शीट वर उडी मारणे, 30 फूट उंचीच्या जाळी वर चढणे व त्यावरून उतरणे इत्यादी प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखविले. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये जीवीत हानी कमीत कमी व्हावी याध्येयाने पालघर जिल्हा प्रशासनाने भूकंप साक्षरता बरोबर वैयक्तिक जवाबदारी सर्व नागरिकांचा ही समावेश अवश्यक असल्याचे मत आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकार्यांनी व्तक्त केले.

“आपला जिल्हा आपत्ती प्रवण जिल्हा आहे.सेंडाईक प्रोमवर्क नुसार एकुण ३२ आपत्ती आहेत.आपण नेहमी फक्त एकाच आपत्तीचा विचार करतो.एका आपत्तीतून दुसरी आपत्ती निर्माण होते. परभणीच्या एका लहान मुलीने आपत्ती प्रशिक्षण घेतले होते.एका प्रसंगात १३ व्या मजल्यावर असताना इमारतीला आग लागली या प्रसंगात त्या चिमुरडीने प्रशिक्षणामुळे अनेकांचे प्राण वाचवले.तिला पंतप्रधानांच्या हस्ते शाैर्य पुरस्कार मिळाला.आपल्या भागात माती आणि विटांची घरे आहेत.भुकंप होऊन शाॅर्ट सर्किट झाल्यास आगीतुन बचावासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनरकडुन हे प्रशिक्षण दिले गेले.विद्यार्थी स्वत: पुढाकार घेऊन सहभाग घेत होते.मात्र काही अाक्षेपामुळे धुंदलवाडी येथे झालेल्या पुढच्या प्रशिक्षणात आग सोडुन इतर प्रात्यक्षिक घेण्यात आले.” विवेकानंद कदम अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पालघर

“चिंचले येथे विद्यार्थ्यांना भुकंप परिस्थिती आगीची परिस्थिती, पूर पतिस्थिति अशा सर्व आपत्ती परिस्थीतीत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती परिस्थीती हाताळण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी सर्व दक्षता घेतली गेली.विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रात्यक्षिक पूर्व प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रात्यक्षिक घेतले गेले.त्यातुन विद्यार्थी प्रात्यक्षिकातून भिती घालवण्यात यश आले.यात “

राहुल सारंग तहसीलदार डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here