पालघर – योगेश चांदेकर :
पालघर तालुक्यातील मोरेकुरण ग्रामपंचायत येथे मुख्य रस्ता ते अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन आज झाले. या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम चालू झाले. यामध्ये बोलताना जेष्ठ नागरिकांनी सरपंचाच्या तसेच इतर सदस्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले व पुढे अशीच कामे करून गावचा विकास करावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सरपंच संखे यांनी आपण आपले काम प्रामाणिकपणे करून गावचा विकास करणार असल्याचीही ग्वाही दिली. यावेळी सरपंच दक्षता संखे, उपसरपंच मिलिंद संखे, ग्रा. प. सदस्य अजित काशीनाथ संखे, निलेश संखे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here