पालघर: वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; हॉटेल व्यावसायिकाचा आदर्शवत उपक्रम..!

0
548

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून आपल्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय तलासरी तालुका इंडस्ट्रियल असोशिएशनचे अध्यक्ष अजित नार्वेकर यांनी घेतला. तलासरी तालुक्यातील अछाड येथील हॉटेल सह्याद्री येथे त्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला लॉक डाऊन असूनही
६३ लोकांनी रक्तदान केले आहे.

वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या नार्वेकर कुटुंबीयांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी सर्व त्या शासकीय परवानग्या घेत सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत हे शिबीर पार पाडले. जवळ जवळ ६३ जणांनी उस्फुर्त भाग घेत रक्तदान केले, त्यामध्ये कुटुंबातील तरुणांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे रक्तदान करताना सर्वांच्याच चेहऱ्यावर रक्तदान केल्याने होणारे समाधान झळकत होते. शिबिरामध्ये नार्वेकर कुटुंबियांसह त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारातील सदस्यांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्ही देशाप्रती कृतज्ञता म्हणून नार्वेकर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही गर्दी टाळून रक्तसंकलनासाठी प्रयत्न करावेत. – अजित नार्वेकर, उद्योजक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here