ब्रेकिंग: पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह..!

0
452

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर हत्याकांडातील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास २० आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यातीलच एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजते. २८ एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्याचा शनिवारी सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे समजले. त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचं देखील समजते आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वाडा पोलीस कोठडीत त्याला इतर २० आरोपींच्या समवेत एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच ४ दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोरोनाबाधित आरोपी सोबत असणारे इतर २० सह आरोपी तसेच २३ पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या घशाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here